शिवसेनेच्या आंदोलनाची इंदापूर आगारा कडून दखल !

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण

इंदापूर आगाराची बस थांब्यावर न थांबल्यास इंदापूर आधार कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने आंदोलन करू असा इशारा इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे, उपतालुकाप्रमुख विजय शिरसट, आधी शिवसैनिकांनी दिल्यानंतर इंदापूर आगार व्यवस्थापक खडबडून जागे झाले.

दि.(१२) रोजी संध्याकाळच्या वेळी काही महिला वडापुरी, शेटफळ हवेली, सुरवड, ला जाण्यासाठी बस थांब्यावर थांबल्या होत्या. त्याचवेळी त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण निर्माण झाले विजादेखील चमकण्यास सुरुवात झाली अंधार पडत चालला असताना त्यावेळी वेळी इंदापूर वरून अकलूज कडे जाणाऱ्या एसटी बस बस थांब्यावर न थांबता निघून गेल्या त्यामुळे महिला भयभीत झाल्या होत्या.व खाजगी वाहनाचा आधार घेत त्या घरापर्यंत पोहोचल्या. ही बाब शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इंदापूर तालुकाप्रमुख व विजय शिरसट यांना माहिती मिळताच. घटनास्थळावरती भेट देत अडचणी समजून घेतल्या होत्या.

याबाबत आता इंदापूर आगार प्रमुखांनी या बसचालक यांच्या विरोधात चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.याबाबत चालक आणि वाहक यांना खुलासा मागवण्यात आला आहे. खुलासा प्राप्त होताच त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत सर्व चालक वाहक यांना प्रत्येक थांब्यावर बस थांबून प्रवासी घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आले आहेत.आगार व्यवस्थापक इंदापूर यांच्याकडून नितीन शिंदे, उपतालुकाप्रमुख विजय शिरसट शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button