
लोकशासन- प्रतिनिधी गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
खाजगी गाडीत “पोलीस” असे लिहिणे केवळ पोलीस असल्यामुळे वैध ठरत नाही. तो कर्तव्यावर असेल आणि शासकीय वाहन वापरत असेल तरच तो वापर योग्य आहे. त्याच्या या कृतीविरुद्ध योग्य पुरावे असल्यास आपण पोलीस अधीक्षक, वाहतूक पोलीस, आणि पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे लेखी तक्रार करू शकता.
पोलीस अधिकारी असला तरी तो ड्युटीवर नसेल आणि खाजगी वाहनाने प्रवास करत असेल तर त्याच्या वाहनावर “Police” अशी पाटी लावणे हा गैरवापर ठरतो. कारण याचा गैरफायदा घेऊन तो विशेष वागणूक मिळवू शकतो, किंवा सार्वजनिक भ्रम निर्माण करू शकतो.
मोटार वाहन कायदा, 1988 (Motor Vehicles Act)
Sec. 39 आणि 50 – खाजगी वाहनाचा व्यावसायिक किंवा अनधिकृत वापर केल्यास कारवाई.
Rule 50/51 of CMVR, 1989 – वाहनावर चुकीच्या पद्धतीने पाटी लावल्यास कारवाई.
पोलीस लिहिलेली पाटी ही “Unauthorized Display” म्हणून मानली जाते.
The Emblems and Names (Prevention of Improper Use) Act, 1950 – “Police” हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरल्यास.
जर अशा परिस्थितीची व्हिडीओ शूटिंग केली, तर कारवाई कोठे करता येईल ?
तक्रार,जिल्हा पोलीस अधीक्षक / पोलीस अधीक्षक कार्यालय (SP Office)
लेखी तक्रार सोबत व्हिडिओ पुरावा जोडून द्या.
स्थानिक वाहतूक पोलीस विभाग (Traffic Police Department)कारण तो वाहन कायद्याचा भंग करत आहे.महाराष्ट्रात Maharashtra State Police Complaint Authority येथे ऑनलाइन तक्रार दाखल करता येते.
त्याचे वाहन खाजगी आहे की शासकीय?त्याने अधिकृत स्टिकर लावण्याची परवानगी घेतली आहे का?RTI दाखल करून माहिती मागवता येते तो ड्युटीवर नसताना “Police” लिहून फिरल्यास कायदेशीर कारवाई.
स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही. फसवणूक करणे किंवा फसवणुकीने स्वतःची चुकीची ओळख निर्माण करणे.