
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच संदीप सिंह गिल यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशनला भेट दिली. तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस विनोद महांगडे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा सत्कार करताना भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड इतर मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी त्यांनी वार्ताहरांशी आणि प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, इंदापूर तालुक्यात मी पहिल्यांदाच पदभार स्वीकारल्यानंतर आलो आहे.
जनतेने थेट माझ्याशी संवाद साधावा जर कुठल्याही पोलीस स्टेशनचा अधिकारी तुम्हाला प्रतिसाद देत नसेल, तुमचं म्हणणं ऐकून घेत नसेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा.कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही. कोयता गँग असो, की गोळीबार प्रकरण असो त्याचा सखोल तपास केला जाईल आणि कडक कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. असे आव्हान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सांगितले.