
लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागांमधून अनेक नागरिक इंदापूर तहसील कार्यालया मध्ये कामकाजा निमित्त येत असतात मात्र या ठिकाणी बसण्याची व्यवस्थाच नसल्याने ”कोणी खुर्ची देता का खुर्ची ” अशी म्हणण्याची वेळ इंदापूर तालुक्यातील नागरिकांवर आलेली आहे.
इंदापूर तहसील कचेरी मध्ये ,भूमी अभिलेख कक्ष, नायब तहसीलदार कक्ष, पुरवठा विभाग कक्ष, संजय गांधी निराधार कक्ष, श्रावण बाळ कक्ष, असे अनेक कक्ष आहेत. मात्र या ठिकाणी इंदापूर तालुक्यातून हजारो नागरिक विविध कागदपत्रांच्या संदर्भात तहसील कचेरी मध्ये येत असतात.मात्र सर्वच ठिकाणी बसण्याची व्यवस्था नसल्याने महिला तसेच पुरुष यांना तासंतास उभे राहावे लागत आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असून त्यांना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक हे बसण्यासाठी कचेरीच्या पायरीचा आधार घेत आहेत.इंदापूर तहसील कचेरी सुसज्ज करण्यात मात्र नागरिकांना बैठक व्यवस्थाच नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही व्यवस्था कधी सुधारणार ? असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
दुसरीकडे अनेक ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करून येत असतात या एसटी बस मध्ये देखील गर्दीमुळे उभा राहून प्रवास करावा लागतो. व कचेरी मध्ये आल्यानंतर त्याही ठिकाणी तासंतास उभे राहावे लागत असल्याने तहसील कचेरी मध्ये बैठक व्यवस्था करण्यात यावी असे मागणी इंदापूर तालुक्यातील नागरिक करीत आहेत.