
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भवानीनगर, सणसर,निमगाव केतकी येथील पालखी मुक्काम तळाची पाहणी गुरुवार २२ मे रोजी करण्यात आली.
यावेळी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जिवन बनसोडे व विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते .जून महिन्यात संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात येणार आहे. ही पालखी चार दिवस इंदापूर तालुक्यात मुक्कामी असते.निमगाव केतकी येथे एक मुक्काम असतो. या ठिकाणी लाखो वारकरी तसेच सर्वसामान्य नागरिक या सोहळ्यात सहभागी होतात. पालखी सोहळा ज्या मार्गावरून येणार आहे, त्याची पाहणी तहसीलदार जीवन बनसोडे केली .
या पाहणी दौऱ्यामध्ये तहसीलदार पथ, विद्युत विभाग, घनकचरा यांसह पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे , इंदापूर गटविकास अधिकारी सचिन खुडे, पुरवठा विभागाचे सपन गडवणर, मंडल अधिकारी मनीषा यादव,तलाठी नितीन यादव ,ग्रामसेवक चंद्रकांत जगताप, सुषमा जाधव , किसान भोंग सर,हेंद्रे सर, माजी सभापती ,दत्ताञय शेंडे, पांडुरंग हेगडे विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.रस्त्यांची सद्यःस्थिती, आवश्यक सोयीसुविधा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था याची पाहणी केली जाणार आहे, असे निमगाव केतकी येथील ग्रामसेवक चंद्रकांत जगताप यांनी दिली सांगितले.
भवानीनगर पासून ते इंदापूर पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना प्रश्न विचारला असता पालखी त्यांनी सांगितले बऱ्यापैकी काम पूर्ण झाले आहे पण जिथे जिथे काम अपूर्ण त्या ठिकाणच्या अडथळे दूर करण्यात येऊन त्याठिकाणी मुरूमीकर करण्यात येईल असे यावेळी सांगितले.