
लोकशासन- प्रतिनिधी : संतोष दहिदुले,वालचंदनगर
लालपुरी (ता.इंदापुर) येथील गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या जत्रेनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नातुन जत्रेचे आयोजन केले असुन जत्रेचे पहिलेच वर्ष आहे. इंदापूर तालुक्यातील लालपुरी हे गाव साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील ग्रामस्थ अनेक वर्षापासून नवसाला पावणाय्रा श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरवावी अशा विचारात होते.त्या प्रमाणे सन २०२५ – २६ या वर्षापासुन ग्रामस्थ यांच्या विचारातुन व सहकार्यातुन श्री महालक्ष्मी देवीची जत्रेचे आयोजन करण्यात आहे.जत्रेला सुरुवात रविवार २५ रोजी सकाळी देवीचा अभिषेक व महापूजा सोमवार२६ रोजी सायंकाळी देवीचा छबिना मिरवणुक , फटाक्यांची आतिषबाजी यानंतर महा प्रसादाचे आयोजन , मंगळवार २७ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून गावातील ग्रामस्थांसाठी व नागरिकांसाठी बलिप्रदा च्या कार्यक्रमाची सुरुवात तर सायंकाळी सर्वांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम ‘ माझी जानू दिसायला नटी’ या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुधिर बोरकर यांनी दिली.