
प्रतिनिधी : संजय शिंदे (लोकशासन) इंदापूर ग्रामीण
इंदापुर : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जिंती येथे रोटरी क्लब ऑफ भिगवन सिटी तर्फे देण्यात आलेल्या ई लर्निंग संचाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ भिगवन चे अध्यक्ष श्री संतोषजी सवाणे त्याचबरोबर श्री रियाज शेख संपत चौधरी, कुलदिप ननवरे , आणि महा 24 तास या वृत्तपत्राचे पत्रकार श्री तुकाराम पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमासाठी जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महावीरजी गोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भागुजी वाघमोडे उपाध्यक्ष सौ तनया धेंडे,ग्रामपंचायत सदस्य गणेशजी घोरपडे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री गणेश राऊत ,श्री शिवाजी भोसले अशोक जगताप, श्री ज्ञानेश्वर वारगड, श्री विनोद शेलार श्री केसकर अण्णा, विद्याधर धेंडे ,वैद्यकीय अधिकारी श्री गाढवे डॉक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गणेश घोरपडे पत्रकार तुकाराम पवार केंद्रप्रमुख गोरे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. जागतिक योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेमधील चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी अक्षरा काळू चव्हाण व प्रिया संदीप जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी व अध्यक्षांनी शाळेचे व सर्व व्यवस्थापनाचे कौतुक केले रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचा व अध्यक्षांचा शाल श्रीफळ व फेटे बांधून सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय मुख्याध्यापक संतोषजी जगताप सर यांनी केले शाळेतील उपक्रमांची माहिती जेष्ठ शिक्षक श्री पाटील सर यांनी दिलीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेळके सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतलेश्री नेवसे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.