
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची व सामाजिक कामाची माहिती देवून त्यांनी केलेल्या धार्मिक कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचेउपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी प्राचार्य डॉ.विजय केसकर ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,प्रा.डॉ.रामचंद्र पाखरे,प्रा.विनायक शिंदे,प्रा.डॉ.प्रशांत शिंदे,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.तेजश्री हुंबे ,प्रा. कपिल कांबळे,प्रा.सचिन आरडे ,प्रा.मंगेश निंबाळकर,प्रा. रवी गायकवाड,प्रा.उत्तम वाघमोडे,प्रा.धुळदेव वाघमोडे ,प्रा.अमित शेटे,प्रा.सुनील सपकळ,श्री.अमोल चव्हाण,इ मान्यवर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.