
लोकशासन- प्रतिनिधी : संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
अखिल नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी नाथबाबा गोंधळी, बहुरूपी भराडी, या भिक्षुक भटक्या जाती जमातीचा एकदिवशीय चर्चासत्र रूपी आमसभा. आज दि ३१ मे रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे संपन्न झाली,या आमसभेला महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या वेगवेगळ्या भागातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव हजर होते.
विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती जमातीतील नाथपंथी समाजासाठी वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ यांची उपकंपनी म्हणून नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे घोषित केले म्हणून महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातील नाथपंथी समाज बांधवांनी महायुती सरकारला भरभरून मतदान केले आणि म्हणून महायुती सरकारने मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर हे नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ अमलात ही आणले, परंतु आमच्यातीलच काही नेतेमंडळींनी त्या विभागाशी सल्लामसलत करून खोटी माहिती देऊन परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असे नाव देऊन त्याचा प्रचार करू लागले,
कै गंगानाथ महाराज हे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे वडील असून त्यांचे नातपंथी समाजासाठी कसल्याही प्रकारचे कोणतेही योगदान नाही आणि हे निवृत्त पोलीस अधिकारी स्वतःची मालमत्ता असल्या चे भासून समाजामध्ये दादागिरी करू लागले आहेत म्हणून नाथपंथी समाजात रोष निर्माण झाला या महामंडळाला सर्वसमावेशक नाव देण्यात यावे अशा प्रकारच्या चर्चा वादविवाद समाजामध्ये गेल्या चार महिन्यापासून सुरू आहेत म्हणून समाजामध्ये कसलेही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि हे नाव सर्व समावेशक असावे म्हणून आजची ही आमसभा घेण्यात आली आणि सर्वांच्या चर्चेअंती काही ठराव करण्यात आले.
१) परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे नाव बदलण्याची ठरली
२) नाव बदलून श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे नाव देण्याचे सर्वानुमते ठरले
३) या महामंडळामध्ये गोरगरीब झोपडीत पालात राहणाऱ्या समाज बांधवाला आर्थिक फायदा घेण्यासाठी ज्या जाचक अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्या
४) याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या भिक्षुक भटक्या नाथपंथी समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी काही मागण्या जसे की अॕट्रॉसिटीसारखा कायदा जात दाखल्यासाठी १९६१ चा पुरावा यशवंतराव चव्हाण पाल मुक्त योजना शासनाने प्रत्यक्ष राबवावी
अशा प्रकारचे ठराव करण्यात आले या सभेमध्ये आमच्या समाजाचे जेष्ठ सेवानिवृत्त अधिकारी माननीय आनंदरावजी जगताप साहेब सेवानिवृत्त आयुक्त माननीय मच्छिंद्र जी चव्हाण साहेब सेवानिवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त, माननीय नारायण शिंदे सेवानिवृत्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, माननीय महादेवजी शिंदे साहेब सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिका माननीय डॉक्टर जयाजीनाथ साहेब नगरसेवक मुंबई माननीय महादेवजी शिंदे साहेब पुणे माननीय रुपचंद सावंत अहिल्यानगर श्रीयुत भालचंद्र सावंत अहिल्यानगर श्रीयुत अंबरनाथ इंगोले प्राध्यापक डॉक्टर सुभाष भोसले सर श्रीयुत मोहन आबा शिंदे, श्री सुमित लगस, श्री अनिल चव्हाण, श्री सहदेव सावंत, यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते यापुढील कायदेशीर आणि रीतसर प्रक्रिया करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली ही समिती नामदार मुख्यमंत्री साहेबनामदार दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल त्या खात्याचे मंत्री यांच्यासोबत पाठपुरावा करण्याचे ठरले आहे.