
लोकशासन- प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत असुन यामुळे अनेक सस्तन तसेच विषारी व बिनविषारी प्राणी , साप सुरक्षित ठिकाणी बसण्यासाठी जागा शोधत असतात.अशातच निमसाखर येथील शेतकरी संभाजी रणवरे यांच्या शेतातील विहीरी वरील मोटर बॉक्स मध्ये बँडेड रेसर (धूळ नागीण) प्रजातीचा साप आढळून आला.बँडेड रेसरला मराठीत धूळ नागीण असे म्हणतात. हा बिनविषारी साप असून कोरड्या रेताड आणि मोकळ्या माळरानात सापडणारा हा साप खुपसा नागासारखा दिसतो. सरडे, उंदीर आणि लहान पक्षी खाणारा हा साप आहे.सापांच्या दुर्मिळ प्रजातींपैकी हि एक प्रजात असल्याचे सर्पमित्र अमित अडसूळ यांनी सांगितले.
निमसाखर येथील रणवरे यांच्या शेतातील मोटर बॉक्स मधून हि धुळ नागीण सुरक्षित काढून सर्पमित्र अमित अडसूळ यांनी निरा नदी किनारी सुरक्षीत ठिकाणी सोडून देण्यात आली.