
लोकशासन-प्रतिनिधी:सत्यजीत रणवरे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सात आमदार फुटुन गेले असुन अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.एका बाजूला अजित पवार व शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा होत असताना दुसरीकडे अजित पवारांचे सात आमदार फुटले आहेत.राष्ट्रीय राजकारण अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असुन सात आमदार फुटुन गेल्याने यांच्या वरती काय कारवाई करता येणार याची तपासणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दोन शकले निर्माण झाल्या नंतर आता अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हि फुटली असुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.नागार्लंड मधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले होते.आता या सात हि आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची साथ सोडून मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालीलनॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने नागार्लंड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
नागार्लंड विधानसभे मधील १)नामरी एन्चांग – टेनिंग विधानसभा,२) पिक्टो शोहे – अटोइझू विधानसभा,३) वाय. मोहोनबेमो हॅम्त्सो – वोखा टाउन विधानसभा,४) वाय. मानखाओ कोन्याक – मोन टाउन विधानसभा,५) ए. पोंगशी फोम – लॉंगलेंग विधानसभा,६ ) पी. लँगन – नोकलाक विधानसभा,७) एस. तोइहो येप्थो – विधानसभा हे सात हि आमदारांचा गट नॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत सामील झाल्याने त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत कारवाई होऊ शकत नसल्याचे विधानसभा सभापतींनी सांगितले आहे.