
लोकशासन- प्रतिनिधी : सत्यजीत रणवरे
दहिगाव हायस्कूल दहिगाव सन १९९९-२००० दहावीची बॅच तब्बल २५ वर्षा नंतर एकत्र शालेय मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन दहिगाव हायस्कूल दहिगाव येथील l दहावी बॅच च्या विद्यार्थ्यांनी मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते या ठिकाणी स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंचवीस वर्षांनी एकत्र येऊन पुन्हा नव्याने एकदा शालेय जीवनाची अनुभूती घेतली यामध्ये १०५ माजी विद्यार्थ्यांपैकी ९६ विद्यार्थी एकत्र आले होते लातूर कोल्हापूर पुणे मुंबई बारामती पंढरपूर या ठिकाणाहून विद्यार्थी एकत्र आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता शिक्षकावर पुष्पवृष्टी करुन स्वागत करत करण्यात आली.त्यानंतर सरस्वती प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर नंतर अनिल सुदाम खिलारे या विद्यार्थ्याचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष वंदनादेवी मोहिते, वनिता देवी पाटील, चोंडे बी.एस.,दीक्षित सी. के, किर्दक टी.डी., नागणे के.डी., क्षीरसागर एस एम, मोरे एम.टी., निर्मळ आय आर., आर्निकर ए .एस., पानसरे ए. एम., शिंदे आय.आर., चव्हाण व्ही. डी.,राऊत एन एस., राऊत ए. एच., ढोबळे एस. जे., बनकर व पाटील शिपाई मामा उपस्थित होते.
यावेळी सर्व शिक्षकांचे स्वागत राणी गोडसे या विद्यार्थिनीने केले केले. प्रास्ताविक निलेश फुले एपीआय मुंबई यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांनी ओळख करून दिली. या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर,इंजिनियर,शिक्षक,पोलीस अधिकारी,शेतकरी,व्यापारी,नर्स अशा विविध कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी स्वराज म्युझिक इव्हेंट्स सुप्रिया व अमोल भिसे बारामती यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.फनी गेम्स व सूत्रसंचालन स्वरनाद प्रोडक्शन चे कुमार देवकाते बारामती यांनी केले . दुपारनंतर स्नेहभोजन शिव केटरर्स अकलूज यांचे स्वादिष्ट जेवणाचे आयोजन केले होते. तेज फोटो स्टुडिओ यांनी ड्रोनच्या साह्याने सर्व कार्यक्रमाचे छायाचित्रण केले. आठवणी जतन करून ठेवले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन किर्दक, निलेश फुले, स्वरूप गांधी, वीरसिंह पाटील, बंडू फुले, उमेश पाटील, जितेंद्र पवार, राहुल पाटील,अनिल किर्दक, किरण शिंदे, राणी गोडसे,सुप्रिया खंडागळे,उर्मिला निकम अनिता फुले, विजया मंगरूळे, सारिका पवार आदींनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व शिक्षकांचे आभार आभार मानून कार्यक्रमाची सांगता सचिन किर्दक यांनी केली.