
लोकशासन- प्रतिनिधी : वालचंदनगर
इंदापूर तालुक्यातील निमसाखर ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी गावचे प्रथम नागरीक सरपंच धैर्यशील रणवरे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
निमसाखर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केल्यानंतर मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत अभिवादन केले व आपले मनोगत व्यक्त केले.तर यावेळी अभिराज धुळदेव शिंदे या लहान मुलाने आपल्या छोटेखानी भाषणातून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रणवरे,गोरख शेळके, राजेंद्र रणमोडे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक अभिजित रणवरे,माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल बोंद्रे,तुळशिदास महानवर, दिपक लवटे,नितीन कारंडे, राजेंद्र पवार, राहुल भोसले, हनुमंत खुडे,मिराज मुलाणी,सुरेश लवटे,बाळासाहेब रणवरे, गणेश सातपुते आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.