
लोकशासन : प्रतिनिधी – मुंबई
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या लोकांना घरे नाहीत व घरकुलाची आवश्यकता आहे. अशा लोकांनी सेल्फ सर्वे ( स्वतः चा सर्वे स्वतःच करणे ) ही सेवा शासना कडून उपलब्ध करून देण्यात आलेली असनू या योजनेच्या मुदती मध्ये वाढ करण्यात आली आहे.सुरवातीला ३० जून पर्यंत असलेली मुदत शासना कडून वाढवून देण्यात आली आहे.आता आपण १८ जून २०२५ सेल्फ सर्वे ( स्वतः चा सर्वे ) करू शकता.
असा करा सेल्फ सर्वे
सेल्फ सर्वे साठी दोन मोबाईल ॲपची आवश्यक असून ते खालील प्रमाणे डाऊनलोड करून घ्यावीत
१) आवास अँप
https://play.google.com/store/apps/details?id=r.rural.awaasplus_2_0
२) आधार फेस RD Service अँप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd
वरील मोबाईल ॲप डाउनलोड करून आपला सेल्फ सर्वे पूर्ण करा. यासाठी आपल्या जवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
१ आधार कार्ड अपडेट
२ जॉब कार्ड अपडेट
३ बँक खाते अपडेट
सर्वे करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा
१) घरकुल साठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी पहिला फोटो अँप मधुन काढणे आवश्यक आहे.
२) या योजनेसाठी जातीचा दाखला आवश्यक नाही.
३) सर्वे करताना ज्या जागेवर बांधकाम करायचे आहे. त्या जागेचा फोटो काढावा.
४) सर्वे केल्या नंतर तो अपलोड करावा.
५) एका मोबाईलवर एक सर्वे होईल..
६) एकत्रित कुटुंब असेल कुटुंब प्रमुख यांच्या नावे जॉब कार्ड
विभक्त कुटुंब असेल तर त्यांचे जॉब कार्ड