
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक महसूल दावे दाखल झालेनंतर विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यानंतर जेव्हा दाव्यांचे निकाल दिले जातात तेव्हा एका पक्षाचे समाधान झाले नाही तर ते वरिष्ठ न्यायालयात पुन्हा महसूली प्रतिदावा दाखल करतात, तसेच वारंवार महसूली दावे झाल्यामुळे वर्षानुवर्षे सदर दावे चालू राहतात.
दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने महसूली दावा निकाली काढण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कायदा-१९८७ मधील कलम-१९ मधील तरतूदीनुसार पुणे जिल्हयातील महसूल विभागातील प्रलंबित महसूली दावे तडजोडीने निकाली काढणेसाठी “महसूल लोक अदालत द्वारे महसूली दाव्यांचे दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होऊन सदर महसूली दावे कायमस्वरूपी निकाली काढणेसाठी सर्व संबंधित पक्षकारांना महसूल लोक अदालतेच्या माध्यमातून संधी देणेत येत आहे.
त्यानुसार आपण या कार्यालयात दाखल केलेले अर्धन्यायीक प्रकरण क्र. २० हे तडजोडीने निकाली काढणेसाठी या कार्यालयात प्रकरणावर छाननी दिनांक ०५/६/२०२५ रोजीचे दुपारी ३.०० वाजता तहसिल कार्यालय इंदापूर या ठिकाणी होईल व महसुल लोक अदालत दिनांक ९/६/२०२५ रोजी याच ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी आपण सदर ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे. आपण गैर हजर राहिल्यास आपले प्रकरण तडजोडीने महसूल लोक अदालत मध्ये घेणेस अपात्र ठरेल.