
लोकशासन – प्रतिनिधी : इंदापुर
भारतीय जनता पार्टीचे नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी इंदापूर विधानसभा मंडल दौरा आखला असून भरतीय जनता पार्टी च्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनच्या भेटी घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष शेखर वढणे हे शनिवार दिनांक ०६ जून रोजी इंदापूर दौऱ्यावर येणार आहेत.
सकाळी ०९:०० वा भवानीनगर भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र निंबाळकर सर सदिच्छा भेट त्या नंतर ०९:३० वा.लासूर्णे (ओबीसी पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे)यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट व इंदापूर विधानसभा मध्य मंडलाच्या वतीने सत्कार व मंडल बैठक सकाळी १०:३० वा. निमगाव केतकी इंदापूर विधानसभा मध्य मंडलाचे अध्यक्ष राजकुमार जठार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.सकाळी ११:०० वा.राखीव दुपारी १२:०० वा. इंदापूर शहर पालखी मैदान पर्यावरण दिनानिमित्त पालखी मैदान येथे वृक्षारोपण दुपारी १२:३० वा. इंदापूर शहर चे शहराध्यक्ष किरण गानबोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व शहराच्या वतीने सत्कार व शहराची बैठकदुपारी ०१:०० वा. इंदापूर पूर्व मंडलाध्यक्ष राम आसबे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व पूर्व मंडलाच्या वतीने सत्कार व मंडल बैठक दुपारी ०२:०० भिगवण इंदापूर विधानसभा पश्चिम मंडलाच्या वतीने सत्कार व मंडलाची बैठकत्या नंतर पश्चिम मंडलाचे अध्यक्ष तेजस देवकते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट अशा प्रकारे हा दोरा होणार असल्याचे तेजस देवकते (पश्चिम मंडलाध्यक्ष) राजकुमार जठार (मध्य मंडलाध्यक्ष) राम आजबे (पूर्व मंडलाध्यक्ष) किरण गानबोटे (इंदापूर शहराध्यक्ष) यांनी सांगितले.