
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यामधील सोनाई डेअरी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांच्यावतीने ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांची फसवणूक झाल्यास आवाज कसा उठवायचा तक्रार कोठे करावी कसा न्याय मिळवावा.बीआयएस या ॲपद्वारे सोने खरेदी करताना ॲपचा वापर कसा करावा फसवणूक झाल्यास तक्रार कशी करावी. याबाबत माहिती दिली.
यासाठी महिलांचा सहभाग घ्यावा असे आव्हान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महिला पुणे जिल्हाध्यक्ष नयनाताई आभाळे यांनी केले .पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यामधील सोनाई डेअरी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांच्यावतीने ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन दि.(५) रोजी करण्यात आले होते.
यावेळी त्या बोलत होत्या ग्राहक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या त्यातच फसवणूक होणाऱ्या अनेक घटना आपण पाहत असतो मात्र तक्रार कशी व कोठे करावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्गदर्शन करण्यासाठी तयार असते या मार्गदर्शनाचा योग्य वापर करून ग्राहक म्हणून आपली फसवणूक आपण टाळू शकतो.
यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष,ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अँड. तुषारजी झेंडे पाटील यांनी महावितरण, किराणा दुकानामधून खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. खाद्यपदार्थाची व्हाट्सअप आणि टोल फ्री नंबर यांच्या वर तक्रार कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.ग्राहक न्यायालयामध्ये दाद कशी मागावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सोनाई दूध डेअरी मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाई डेअरीचे संचालक अतुल भैय्या माने होते.पुणे जिल्हाध्यक्ष अँड. तुषार जी झेंडे पाटील, कृषी विभाग प्रमुख किशोरजी भोईटे, महिला जिल्हाध्यक्ष नयनाताई आभाळे,पुणे जिल्हा सहसंघटक दिलावरजी तांबोळी, अँड.कोमल बोरा, मावळ महिला तालुका अध्यक्ष कामिनी कडू, इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, संघटक सचिन रणसिंग, सचिव शत्रुघ्न घाडगे, महिला तालुकाध्यक्ष अर्चना सपकळ, सचिव नाजिया सय्यद, संघटक पूनम गुप्ते, महेश सपकळ, उपाध्यक्ष चांगदेव शिंदे, कोषाध्यक्ष दादासाहेब भोंगळे, लिंबाजी कुंभार, सहसंघटक आबासाहेब निंबाळकर, शालिनी साळुंखे, सणसर अध्यक्ष गणेश गुप्ते, सचिव मंगेश खरात ,बेलवाडी अध्यक्ष नानासो कदम, सचिव गणेश भिसे, तात्यासाहेब बंडगर, रसूल पठाण, औदुंबर हुलगे, विलास गटकुळ, विश्वनाथ करडे, श्रीकांत घोगरे, शिल्पा धापटे, दत्तात्रय रासकर, दिलीप दुपारगुडे, सरिता थोरात,सचिन पवार आदी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य उपस्थित होते.