
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
शंभर रुपयाच्या मुद्रांक बॉड विषयी शेतकऱ्यांचे हालहोत असुन यासंदर्भात सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विभागाला अधिकृत निवेदन ई-मेलद्वारे पाठवण्यात आले असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.
अहिल्यानगर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शंभर रुपयाच्या मुद्रांक स्टॅम्प मिळत नसल्याने छोटा मोठया कामासाठी पाचशे रुपयाचा मुद्रांक बाँड(स्टॅम्प) घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो या कारणाने ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह जिल्हाध्यक्ष दिपक पाचपुते यांनी महेंद्र एस. महाबरे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, अहिल्यानगर यांना मुद्रांक विक्री बाबत लेखी तक्रार करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.
निवेदन देत म्हटले आहे की, नगर तालुक्यात १०० रुपये किंमतीचा मुद्रांक विक्रेते यांनी मागणी केलेली असून मुद्रांक विक्रेते देण्यास टाळाटाळ करत असुन सदर मुद्रांक विक्रेते हे शासनाच्या धोरणानुसार मुद्रांक किंमत ५०० रुपये पेक्षा कमी मुद्रांक देता येत नाही. असे सांगत आहेत परंतु प्रत्यक्षात शासन नियमानुसार मुद्रांक किंमत १०० रुपये किंमतीचे मुद्रांक विकु नये असे कोठे हि परिपत्रकामध्ये आढळत नाही. काही कामांकरिता ५०० रुपये किंमतीचे मुद्रांक शुल्क वापरण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे.
तरी या मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी सर्व मुद्रांक विक्रेते यांना आदेशीत करुन १०० किंमतीचे मुद्रांक विक्री करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.