
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले आहे. या संबंधी समाजाला जागृत करण्यासाठी व समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून शिव फाउंडेशन व वन विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर व वन विभागाचे संध्या कांबळे- वनरक्षक भिगवण,विलास निकम – वनपाल भिगवण,अक्षय खोमणे – वनमजूर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रम प्रसंगी योगेश चव्हाण,संजय खाडे,किरण राईसोनी, सतीश शिंगाडे, दत्ता गायकवाड, दिनेश मारणे, संतोष सवाने, कुंडलिक भांडवलकर, सतीश सकुंडे, संतोष अब्बड, आकाश वनवे, बाळासाहेब तांबोळी, वैभव सकुंडे, निलेश गायकवाड संजय शिंदे आदिनाथ उपस्थित होते.