
लोकशासन – मुंबई
अहमदाबाद मध्ये एअर इंडिया कंपनीचे ड्रिमलायनर ७८७ हे ३०० प्रवासी क्षमता असेले विमान कोसळले आहे.या विज्ञानामध्ये साधारण २४२ प्रवासी असल्याची माहिती समोर येत असुन या मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते विजय रुपाणी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दि.१२ जुन रोजी दुपारी ०१:३८ मिनिटांनी हा अपघात झाला असुन गुजरात मधील अहमदाबाद च्या मेघानीनगर भागातील लोकवसाहती मध्ये सुमारे एक हजार पाचशे फुटांवरून हे विमान कोसळले आहे.विमानातील प्रवाशांना तत्काळ मदतकार्य मिळुन दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.या अत्यंत दुर्दैवी घटनांमुळे स्थानिकां कडून मदत कार्यात सहभाग घेतला जात असून दुपारी ०१:१७ मिनिटांनी या विमानाने अहमदाबाद विमानतळा वरुन उड्डाण केले होते.
केंद्र शासना कडून मदत कार्यास व प्रवाशांना मदतीचे आश्वासन देण्यात आले असून गृहमंत्री अमित शहा यांच्या कडून अपघाची माहिती घेऊन बचाव कार्यात मदतीच्या सुचना करण्यात आल्या असून केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.