
लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर : १०(सा.वा.) पोस्ट ऑफिस हे भारत सरकारच्या अंतर्गत येणारे जुने विभाग असून तळागाळापर्यंत याची नाळ जोडलेली आहे .भारतामध्ये एक लाख पास्सट हजार च्या वरती याची व्याप्ती आहे असे प्रतिपादन बारामती विभागाचे उपविभागीय अधीक्षक विजय कदम यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे भारतीय डाक विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जनजागृती करण्यात आली यावेळी ते बोलत होते.प्रधानमंत्री सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, आरडी खाते काढणे, सुकन्या योजना आशा विविध योजना सध्या पोस्टामार्फत दिले जात आहेत.
भारतीय डाक(पोस्ट )ऑफिस च्या विविध योजनांबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. बारामतीचे भारत डाक विभागाचचे नवनियुक्त उपधीक्षक विजय कदम यांचे स्वागत अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका व भवानीनगर वालचंदनगर पोस्ट ऑफिस च्या वतीने करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर सचिव शत्रुघन घाडगे, कोषाध्यक्ष दादासाहेब भोंगळे, इंदापूर तालुका संघटक सचिन रणसिंग, भवानीनगर अध्यक्ष गणेश गुप्ते, सचिव मंगेश खरात, महेश काका सपकळ, बेलवाडी अध्यक्ष नाना कदम, सचिव गणेश भिसे, गणेश जाधव,इंदापूर तालुका महिला सचिव नाजिया सय्यद, संघटक पूनम गुप्ते, भवानीनगर पोस्ट ऑफिस चे ऋषिकेश पवार आधी भवानीनगर वालचंदनगर या भागातील पोस्टमन उपस्थित होते.