
लोकशसान – प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
बारामती – बावडा मार्गावरून एका कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मार्गस्थ होताना कळंब (ता.इंदापुर) येथे काही वेळ थांबुन स्थानिक राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवुन स्वागत करत सत्कार करण्यात आला.
कळंब ( ता.इंदापुर) येथील कळंब ग्रामपंचायतच्या समोरील भागामध्ये बारामती – बावडा या मार्गाचा वापर करुन माळशिरस (जि.सोलापुर) या भागातील एका कार्यक्रमासाठी मार्गास्थ होत असताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे या मार्गावरुन मार्गस्थ होणार याची कल्पना या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होती.
त्याप्रमाणे सोमवार दि.०९ रोजी दुपारी राम शिंदे यांना काही वेळ कार्यकर्त्यांसाठी थांबण्याची विनंती केल्यानंतर गाड्यांचा ताफा थांबला आणि उपस्थित स्थानिक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तोफा आणि फटाके वाजवत विधान परिषदेचे सभापती यांचे स्वागत करण्यात आले.
प्रथमच कळंब गावावरून मार्गस्थ होत असल्याने शिंदे यांचे स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे व माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल अर्जुन यांनी शाल ,फेटा आणि श्री गणेशाची मूर्ती भेट देत पुन्हा कळंब गावामध्ये पुन्हा येण्याचे निमंत्रण देण्यात आले.यावेळी शिंदे यांनी प्रतीसाद देत नक्कीच पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन पुढील कार्यक्रमांसाठी मार्गस्थ झाले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र ढोबळे , दादा पाटील ,विशाल वाघमोडे ,स्वप्निल मडके, गणेश वरुडकर, प्रवीण वाघ, संभाजी चव्हाण, बापूराव डोंबाळे, दत्तात्रय शेंडगे यासह स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.