पुणे ग्रामीण पोलिसांच्या गळाला लागला तीन खून करणारा आरोपी ! प्रेमसंबंधातून हत्या

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी : गणेश गुप्ते

दिनांक २५ जून रोजी राजनागाव गणपती गावच्या हद्दीत पुणे नगर हायवे लागत एक महिला व दोन लहान मुले असे तीन मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेल्या अवस्थेत सापडले होते.मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच सदरच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरा नसल्याने पुरावे मिळणे कठीण होते.

या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग,एस.डी.पी.ओ.प्रशांत ढोले, शिरूर विभाग,एस.डी.पी.ओ.बापूराव दडस, दौंड विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पो स्टे चे पो नि महादेव वाघमोडे यांची तातडीने बैठक घेऊन गुन्हा उघडकीस आणण्या बाबतीत सुचना करण्यात आल्या.

पोलीस पथकांमार्फत पुणे नगर हायवे रोडवरील सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज वाघोली ते राहुरी पर्यंत चेक करण्यात आले. सुमारे १६५०० भाडेकरू तपासण्यात आले, चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव एम.आय.डी.सी. तील कामगारांकडे तपास केला गेला, तसेच मृतदेहाचे हातावरील नावाच्या आधारे बँका मधील काही खातेदारांची माहिती घेवून तपास करणेत आला, आशा वर्कर्स, आरोग्य विभागातील सेविका यांचे कडून लहान मुलांचे अनुषंगाने तपास करून लसीकरणाची माहिती घेत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करणेत आला. दरम्यान हातात येणारे संशईत धागेदोरे पडताळणेत येत होते, परंतु मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आले नव्हते.

पुणे ग्रामीण जिल्हयातील ३३ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची पाच दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात स्वतः बैठक घेवून त्यांनी स्वतः सर्व अंमलदारांना सूचना करत एस.डी.पी.ओ. शिरूर, प्रशांत ढोले व स्था.गु.शा.चे पो.नि. अविनाश शिळीमकर यांचे अखात्यारीत एकूण २८ अंमलदारांची ६ तपास पथके तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात रवाना केली. प्रत्येक जिल्हयातील स्था.गु.शा.चे प्रभारी अधिकारी यांचेशी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व रांजणगाव पो स्टे चे पोनि महादेव वाघमोडे यांनी समन्वय साधला.

सर्व तपास पथकामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात जावून मानव मिसींगची माहिती घेवून पडताळणी करण्यात आली. बीड जिल्हयात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मानव मिसींग नं. १२/२०२५ दि ०९/५/२०२५ मध्ये एक महिला मिसींग असलेबाबत नोंद आढळून आली, सदर महिला ही मृत महिलेच्या वर्णनाची असल्याने त्याबाबत सखोल तपास करणेत आला.मृत महिला व मिर्सीग महिला ही एकच असल्याची खात्री झाली.

मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे वय २५ वर्ष रा. वाघोरा, ता माजलगाव जि बीड असे असल्याचे निष्पन्न झाले. तिचा पती केशव सोनवणे याचेकडे चौकशी केली असता, स्वाती सोनवणे ही तिच्या दोन मुलांसह आळंदी येथे तिचे आई वडीलांकडे गेली होती. तिचे व नवऱ्याचे भांडण होत असल्याने स्वाती व तिची दोन्ही मुले स्वराज वय २ वर्षे, व विराज १ वर्ष यांचेसह स्वातीचे बहीणीचा दिर नामे गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मूळ रा. चिखली, ता, श्रीगोंदा जि, अहिल्यानगर याचे मोटार सायकलवरून दि. २३/०५/२०२५ रोजी रात्रो ०९/०० वा सुा स आळंदी येथून गेलेली असल्याची माहिती समोर आली.


मृत महिला स्वाती केशव सोनवणे हिचे आई वडील हे आळंदी येथे मोलमजूरी करतात, त्यामूळे त्यांनी तिचे बाबत पुन्हा माहिती घेतली नाही. ती कोठे आहे हे त्यांना माहिती नव्हते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांनी दिर गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.

आरोपी गोरख पोपट बोखारे याचे भावाला मृत स्वाती सोनवणे हिची बहीण दिलेली असून मृत स्वाती ही आरोपीचे चुलत मामाची मुलगी असल्याने ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. मृत स्वाती व तिचा नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत होत, त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्यांचेतील वाद मिटवत असे त्यादरम्यान आरोपी गोरख बोखारे व मृत स्वाती सोनवणे यांचेत प्रेमसंबंध तयार झाले होते. त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे यास लग्न करण्याची मागणी करत होती.

दि. २३/०५/२०२५ रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याचेकडील मोटार सायकलवर मृत स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले यांना आळंदी येथून घेवून सरदवाडी शिरूर येथे जात असताना रात्रीचे वेळी रांजणगाव गणपती गावचे हद्दीतील पुणे-नगर हायवेरोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे कच्या रोडलगत मोटार सायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आरोपी गोरख पोपट बोखारे वय ३६ वर्षे सध्या रा. सरदवाडी ता. शिरूर जि पुणे मुळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर यास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून त्यास मा. न्यायालया समक्ष उपस्थित केले असता दि. ११/६/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे.

सदरची कार्मागरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा, अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार बारामती विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. प्रशांत ढोले, शिरूर विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. बापूराव दडस, दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पो स्टे चे पो नि महादेव वाघमोडे, AHTU पुणे ग्रा.चे पोनि विश्वास जाधव, स्थागुशा चे स.पो.नि. दत्ताजोराव मोहिते, रांजणगाव पो स्टे चे निळकंठ तिडके, पोसइ अविनाश थोरात, मपोसई सचिता काळे, शिक्रापूर पो स्टे चे पोसई महेश डोंगरे स्थागुशा चे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजू मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश चिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पो स्टे चे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पो स्टे चे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पो स्टे कडील विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button