भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांचा इंदापूर तालुक्यात दौरा ! इंदापूर तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी : सत्यजीत रणवरे

भारतीय जनता पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांची निवड करण्यात आली आहे नियुक्ती नंतर भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांनी इंदापूर तालुक्याचा दौरा केला असुन यावेळी शेखर वढणे यांनी इंदापुर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून आक्टोंबर अखेर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.तर इंदापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या दरम्यान लागत आहेत.त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त्या व बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष शेखर वढणे यांचा इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या सणसर मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र निंबाळकर, संचालक शिवाजी निंबाळकर आणि भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सत्कार केला या नंतर ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांच्या कार्यालयात शेखर वढणे यांचा सत्कार करण्यात आला.नंतर इंदापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वृक्षारोपण करुन देशपांडे व्हेज येथे पक्षाची मिटींग घेण्यात आली यावेळी शेखर वढणे यांचा इंदापूर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांनी सांगितले की येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र नाही लढलो तरी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले.त्याच बरोबर भारतीय जनता पक्षाच्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व ज्या योजना राबविल्या आहेत त्याची माहिती सर्व सामान्य लोकांन पर्यंत पोहोचवण्याच्या सुचना शेखर वढणे यांनी दिल्या.तर पुढील काळात बुध कमिट्या प्रबळ करुन प्रशासनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सामिल होऊन सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे अशा सुचना वढणे यांनी यावेळी केल्या.

यावेळी जिल्हा महामंत्री आकाश कांबळे ,ओबीसी पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे ,पश्चिम मंडल अध्यक्ष तेजस देवकाते, मध्य मंडल अध्यक्ष राजकुमार जठार ,पूर्व मंडल अध्यक्ष राम आजबे, शहराध्यक्ष किरण गानबोटे,प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती वनवे ,प्रदेश निमंत्रित कार्यकारी निमंत्रित सदस्य माऊली चवरे, रमेश खारतोडे, बाळासाहेब पानसरे, गोविंद देवकाते, ज्येष्ठ नेते सदानंद शिरदाळे, प्रेमकुमार जगताप, रविंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुनील जागडे, आबासाहेब थोरात, धनंजय कामठे, प्रवीणकुमार शहा, प्रवीण सलगर, तानाजी मारकड, शहर युवा मोर्चा अध्यक्ष लखन जगताप,ज्योतीराम कुरडे,हर्षवर्धन कांबळे,तानाजी देशमुख,बिभीषण लोखंडे, मिलिंद शिंदे, शिंदे सर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button