
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील महावितरण कंपनी जंक्शन यांचा भोंगळ कारभार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या अनेक ग्रामीण भागामध्ये दुपारच्या वेळी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा महावितरण लावला आहे.
याचाच विरोध म्हणून अनेक नागरिक स्मार्ट मीटर अमान्य असल्याबाबतचे अर्ज मेन कार्यालय जंक्शन येथे घेऊन जात आहेत.
मात्र या महावितरण कार्यालय सध्या रामभरोसेच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
बारामती येथे महावितरण वर्धापन दिनानिमित्त जंक्शन शाखेतील सर्वच अधिकारी बारामती कार्यालय मध्ये गेल्यामुळे अनेक नागरिकांचा कामाचा खोळंबा होऊन ग्राहकांना ससेहोलपट करण्याची वेळ आली आहे.
याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे महिला इंदापूर तालुका अध्यक्षा अर्चना सपकाळ, इंदापूर तालुका सचिव नाजिया सय्यद, इंदापूर तालुका संघटक पुनम गुप्ते सणसर सचिव मंगेश खरात यांनी याबाबत महावितरण लोकपाल , कार्यकारी अभियंता बारामती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
दि.(६) रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे स्मार्ट मीटर बसू नयेत यासाठी लेखक तक्रारी आल्या होत्या . या अनुषंगाने या महिला जंक्शन येथील महावितरण कार्यालयामध्ये गेल्या मात्र त्या ठिकाणी फक्त शिपाई उपस्थित होता.त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली .
मात्र शिपायाकडून सांगण्यात आले की सर्व अधिकारी बारामती येथे वर्धापन दिनानिमित्त गेले आहेत.
त्यावरती त्यांनी हालचाल रजिस्टरची मागणी केली.
मात्र हालचाल रजिस्टर देण्यासाठी त्यांनी नकार दिला.
तसेच शिपायाच्या गळ्यामध्ये आय कार्ड नव्हते शासन निर्णयानुसार आय कार्ड घालणे हे बंधनकारक आहे , ग्राहकांना हालचाल रजिस्टर पाहण्यासाठी दिले जाते मात्र त्या ठिकाणी नकार देण्यात आला. तक्रार वहीची मागणी केली त्याही गोष्टीला नकार देण्यात आला.
त्यातच कार्यालयामध्ये सक्षम अधिकारी एकही नव्हते .
त्यामुळे सर्वच कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनानिमित्त बारामती मध्ये बोलवण्यात आले होते का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आय कार्ड ना घालणे, तक्रार वही न देणे, हालचाल रजिस्टर न देणे म्हणजे शासन परिपत्रकाचे उल्लंघन केले असल्याने यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे महिला तालुकाध्यक्ष अर्चना सपकळ, सचिव नाजिया सय्यद,सणसर सचिव मंगेश खरात यांनी महावितरण चे लोकपाल तसेच कार्यकारी अभियंता बारामती यांच्याकडे केली आहे.