पोलीस प्रशासना कडून पालखी मुक्काम स्थळांची पाहणी !

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी‌ : इंदापुर

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज पालखी तळाची पाहणी पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्या मधुन संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असते.या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल यांनी इंदापुर तालुक्यातील इंदापूर, निमगाव केतकी,निरवांगी येथील पालखी मुक्काम स्थळांची पाहणी करून माहिती घेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त सुचना केल्या.

दिनांक ११ जुन रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सणसर पालखी स्थळ, बेलवाडी गोलरिंगण व श्री. संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्यातील लासुर्णे व निरवांगी मुक्काम ठिकाणी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button