निमगाव केतकी येथील पालखी तळाची वाहतूक विभाग व पोलीस प्रशासना कडून पाहणी

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी‌ : इंदापूर ग्रामीण

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी चे देहू येथून १८ जुन रोजी प्रस्थान होणार असून २८ जुन रोजी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे पालखी मुक्कामी आहे.पालखी मुक्काम स्थळांची पाहणी प्रशासना कडून करण्यात येत असून वरीष्ठ पोलिस अधिकारी सोमनाथ पडळकर यांनी निमगाव केतकी येथील पालखी मुक्काम तळाची पाहणी करून रस्ता वाहतूक व वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी निमगाव केतकी येथील रस्त्यावर लावण्यात येणारी वाहने, निमगाव केतकी मधील होणारी वाहतूक कोंडी व वाहतूकीतील अस्ताव्यस्तपणा या बाबतीत भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष राजकुमार जठार यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन निमगाव केतकी येथील वाहतूकीतील अस्ताव्यस्त पणा, बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी या बाबतची माहिती दिली.यावेळी मनसे नेते राजू भोंग विनोद डोंगरे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button