विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार व ‘रोटरी क्लब’ भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने हिमोग्लोबिन तपासणी

Spread the love

लोकशासन- उपसंपादक : गणेश गुप्ते

इंदापूर : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा. निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक आहार घेतल्यास त्याचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम कसा होतो या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यान व हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आयोजन विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रोटरी क्लब, भिगवण अंतर्गत केले गेले .

याप्रसंगी भारती हॉस्पिटलमध्ये स्त्री रोगतज्ञ म्हणून अनेक वर्ष कार्यरत असलेले डॉ. किरण पुरोहित व त्यांची टीम उपस्थित होती .

रोटरी क्लब भिगवणचे अध्यक्ष संतोष सवाने ,सेक्रेट्री संजय रायसोनी, खजिनदार कुलदीप ननवरे माजी अध्यक्ष संपत बंडगर,सचिन बोगावत ,संजय खाडे व संजय चौधरी यांच्या सहकार्याने शाळेतील रोटरॅक्ट क्लब सदस्य व हेल्थ क्लबने कार्यक्रमाचे नियोजन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत शाळेतील शिक्षिका राधिका प्रक्टूर यांनी केले.

विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करताना किरण पुरोहित यांनी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या,खजूर,मनुके यांचा समावेश केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनच्या पातळीमध्ये वाढ होते तसेच प्रथिनांचा समावेश कसा असावा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चर्चेद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने आहार व व्यायाम या घटकांचे महत्त्व समजावून सांगितले .

शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे व पर्यवेक्षिका निर्मला अड्डेपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष अर्चना जानकर,मोहिनी गावडे व हर्षदा बोडरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button