इंदापूर तहसील कचेरी मधील त्या कर्मचाऱ्यांची‌ बदली‌ करा !

Spread the love

लोकशासन- उपसंपादक : गणेश गुप्ते,इंदापूर

इंदापूर : दिनांक २० इंदापूर तहसील कचेरी मधील संजय गांधी निराधार शाखेतील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी अन्यथा शिवसेना तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेने कडून देण्यात आला असून.याबाबतचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार जिवन बनसोडे यांना शिवसेने कडून देण्यात आले.

शिवसेने कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि शासकीय कर्मचारी अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक निराधार लाभार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देऊन वारंवार तहसील कचेरी मध्ये हे कर्मचारी फेऱ्या मारण्यास भाग पाडत असून या कर्मचाऱ्यांमुळे लाभार्थींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात यावी.

लाभार्थी यांचे हयातीचे दाखले व इतर कागदपत्रे गाव कामगार तलाठी यांच्यामार्फत ज्या त्या गावातच जमा करण्यात यावेत.लाभार्थ्यांची प्रकरणे पडताळणी करून लाभार्थ्यांनी दिलेल्या कागदपत्राच्या आधारेच मान्यता देण्यात यावी.अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे इंदापूर तालुकाप्रमुख रामचंद्र जामदार यांनी दिला आहे यावेळी अँड. श्रीनिवास फडतरे, कमलताई लोंढे, हनुमंत बनसोडे, व इंदापूर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button