विद्यालय,महाविद्यालया कडून शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अवैध वसुली झाल्यास कारवाई करा | शिक्षण संचालनालयाच्या सुचना

Spread the love

लोकशासन – पुणे जिल्हा

पुणे : विद्यालय व महाविद्यालया कडून शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी विद्यार्थी व पालकांची पिळवणूक होत असुन अनेक शाळा कडून शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अवैध फि आकारली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर “लोकशासन” चे उपसंपादक व ग्राहक पंचायत चे पदाधिकारी गणेश गुप्ते यांनी संबंधित विभागाकडे या बाबत तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागा कडून सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना या बाबतीत पत्र देण्यात आले आहे.

सध्या १० वी १२ चे निकाल लागले असून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी नव्याने प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे.यासाठी १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखल काढण्यासाठी विद्यार्थी व पालक शाळा मध्ये येत आहेत.मात्र बहुतांश शाळांमध्ये या विद्यार्थी व पालकांची फि व निधीच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचे दिसून येते.वास्तवीक पाहता शासकीय फि व्यतिरिक्त तसेच मनाविरुद्ध किंवा गैरसमज करवुन अथवा अडवणूक करून अशा प्रकारची फि किंवा निधी घेणे म्हणजे एक प्रकारे निधी हे सोज्वळ नाव दिलेली खंडणीच नाही का ?

शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अशाच‌ प्रकारे इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी फि किंवा निधीच्या सोज्वळ नावाखाली शाळा कडून वसुली होत असल्याचे निदर्शनास आल्याने लोकशासनचे उपसंपादक गणेश गुप्ते यांनी शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.याच अनुषंगाने या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाने विभागीय उपसंचालक सर्व व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सर्व यांना पत्राद्वारे अशा प्रकारे वसुली करण्यात येऊ नये अशा सुचना देण्यात आल्या असून.अशा प्रकारे अवैध वसुली केल्यास त्या शाळांवर कारवाई करुन त्याच्या अहवाल शिक्षण संचालनालय व तक्रारदाराना देण्यात याव्यात असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button