
लोकशासन – प्रतिनिधी : मयुर माने,अकलूज
क्रांती-परीस : लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील
माळशिरसच्या ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा सहकार महर्षीचा वारसा पूढ़े घेऊन जाणारे लोकनेते, आपल्या सर्वांचे आदर्श श्रद्धास्थान प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांना ६७ व्या जयंती निमित्त विनम्रअभिवादन!
“विना सहकार नाही उद्धार” हे तत्व्व बाळगणारा महामानव याधरतीवर दर्मिळ आहे. आज प्रत्येक व्यक्ती स्वार्थाच्या पाठीशी धावत आहे.अनेकजण इतरांच्या कर्माचा शिडीसारखा वापर करून उच्चस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करतात व कालांतराने पदोच्य्त होताना दिसतात.आपल्या कर्तृत्वाचा जो पाया असतोतो भक्कम व निष्पाप असावा लागतो. तरच आपली वाटचाल पवित्र असते है जाणून वाटचाल करणारेआमचे दैवत म्हणजे पाप्पासाहेब! अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत माणूस आपल्या मानवी जीवनाचीमल्ये विससरून जातो, व स्वतः:स योग्य वाटेल तीच वाट त्याला योग्य वाटत असते व सर्वानी ते मान्य करावेअसा त्याचा अट्वहास असतो. अगदी याच धोरणावर पाप्पासाहेबांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जाबविचारला. परमेश्वराने सांगितलेली मुल्ये जनतेमध्ये रुजवणारा माणुस हा परमेश्वरच असतो. पप्पासाहेबांनीसमाजामध्ये ही नितीमुल्ये स्वतःच्या कृतीद्वारे सिद्ध केले.
वारसा मिळतो परंत् तो अखंड चालवण्यामध्ये खरी कसरत असते. त्यासाठी योग्य धोरण असावे
लागते. सहकार महर्षींच्या कारकीर्दीचा जिता जागता अनुभव घेत पप्पासाहेबांनी माणूस जोडण्याचा मंत्र
अखंडपणे जपला व याचा परिणाम म्हणून आज त्यांच्या पाठीशी जीवापाड प्रेम करणारी जनता पर्वताप्रमाणे
उभी असलेली आपणास पहावयास मिळते. एवढे मोठे पाठबळ असुनही जीवात जीवमान असे तो
जन्सेवाच करू!” हे त्यांचे ब्रीदवाक्य महान लोकांनाही आत्मपरीक्षण करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे.
पप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वात ते नितळपणे अणि निस्वार्थीपरणे जाणवते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आदर्श कामगिरी करण्याचे भाग्य त्यांना लाभलेले आहे. समाजाची जपणूक करता करता सामन्याच्या मनाचीही
जपणूक करण्याचा त्यांचा मानस आजही आपणास दिशादर्शक व दीपस्थंभ आहे.
पप्पासाहेबांनी जे काम हाती घेतले ते प्रत्येक काम परिसाच्या स्परशनि दैदिप्यमान बनले आहे.
त्यांची काम करण्याची खुर्बी ही परीसाहन कमी नाही. त्यांनी १९८१ मध्ये शंकरराव मोहिते-पाटील ब्लड
बँकेची स्थापना केली., लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे १९८२ साली शंकरराव मोहिते -पाटील इंडस्ट्रीयल
सोसायटीची स्थापना केली. आपल्या समाजकार्याला कधीच विराम दिला नाही. जनतेच्या हितासाठी अनेक
सामाजउपयोगी कामे हाती घेतली व अखंडपणे चालूच ठेवली. महर्षीच्या कामाची सूत्रे हाती घेणारे
प्रतापसिंह हे एकमेव होते. श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या समाजकार्याला गती
मिळाली. कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांनी कारखाना विस्तार आणि शेतकनयांचे हित सांभाळण्याची महत्वपूर्ण जबाबदारी काटेकोरपणे सांभाळली,
१९९२ ते १९९६ या कालखंडात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना पप्पासाहेबांनी ऐतिहासिक विक्रम निर्माण केला. सोलापूर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात २८ व्या क्रमांकाची जिल्हा परिषद होती.पप्पासाहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताच विविध योजना आणि प्रश्नांना गती दिली. त्यामुळे ही जिल्हा परिषद राज्यात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवली. याच वेळी पाप्पासाहेबांनी जिल्हा परिषदेच्या विद्याथ्थ्यांसाठी विम्याची सुविधा राबवली. पुढे हि योजनाच महाराष्ट्र शासनाने बरवून पप्पासाहेबांच्या
कार्याचा गौरव केला. तसेच ग्रामीण भागात शाळेसाठी १२०० शाळाखोल्या बांधल्या. शेतीसाठी पाण्याची
सुविधा निर्माण व्हावी यासाठी कोल्हापरी पद्धतीच्या बंधाच्याची योजना सक्षमपणे राबविली.
संकटसमयी धावुन जाण्याचा पप्पासाहेबांचा धाडशी स्वभाव ! त्यांनी १९९३ च्या किल्लारी
भुकंपावेळी जनसेवा संघटना आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या संय्क्त विद्यमानाने मदत कार्य करून
अनेकांचे प्राण वाचवले व निराधारांना मदतीचा हात देऊन त्यांचे पुनर्वसन केले, या भूकंपामध्ये अनाथ
झालेल्या मुला मु्लींना पप्पासाहेबांनी जनसेवा संघटनेच्या रूपाने पालकत्व मिळवून दिले. तसेच
गुजरातमध्ये झालेल्या भुकंपावेळी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून ६ लाख रुपयांचा निधी पाठवत प्रांतवाद
व भाषावाद या खुळचट संकल्पांना कृतीतून त्यांनी जोरदार तडा दिला आणि असल्या संकल्पना आपल्या
व्यक्तीमत्वात आणि जनसेवेत नसतात हे दाखवून दिले.
शंकरराव मोहिते -पाटील ब्लड बँकेच्या वतीने १९७८ पासून प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते.
पाप्पासाहेब राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकनयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार चळवळींचा पुरिपूर
वापर केला. तसेच जिल्ह्यातील सहकार चळवळीला मदत देवून वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी अपल्या
कामाचा जो वारसा जपला, ती सर्व कामे यशस्वी झाली. त्यातील एक आधारवड म्हणजे त्यांनी स्थापन
केलेली जनसेवा संघटना. १९७५ साली जनसेवा संघटनेची वाटचाल सुरु झाली व जिल्हा परिषद अध्यक्ष
असण्याच्या काळात हीच संघटना स्वकरत्त्वाने बहरून गेली. याच माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा
छड़ा लावून त्या सामन्यांच्या दारापर्यंत त्यांनी आणून पोहोचवल्या हे केवळ समाजाविषयी असलेल्या
अपुलकीमुळेच!
आदरणीय पपासाहेबांचा स्वभाव उमदा, कृतीशील व सहसंवेदनशील होता. प्रतिकृल परिस्थितीमध्ये
आव्हान स्वीकारणे व लढवैय्या सेनापतीप्रमाणे ते पूर्ण करून दाखवणे यात नेहमीच त्यांचा हात खंडा राहिला.
सामाजिक दरी व वाद ते आपले कुटुंब समजून सोडवत, दोन्ही बाजू कशा सुरक्षित राहतील याची दृष्टी त्यांना
स्वभावतः मिळालेली होती. आज माळशिरस तालुक्यातील असलेले शेतकरी व त्यांची प्रगती आणि
युवकांची जनजागृती विचारात घेतली तर पप्पासाहेबांच्या कर्तृत्वाची साक्ष पटेल.
शेतकऱ्यांचे व सामान्य लोकांचे नेमके प्रश्न ओळखण्याची कला काकासाहेबांकडे होती व अगदी
तोच वारसा पप्पासाहेबांनी उचलला व कायम केला. पुर्णे जिल्ह्यातील धरणातुन २० टी.एम,सी. पाणी प्रथम
उजनी धरणात सोडावे व उजनी धरणातील पाणी ठराविक एखाद्या बोगद्यात न सोडता ते पाणी पक्षपात न
करता जिल्यातील सर्व तालुक्यांना समान प्रमाणत मिळावे यासाठी दि. २६/१२/२०१२ रोजी टेंभूर्णी येथे
जनसेवा संघटनेतर्फ महा रस्ता रोखो आंदोलन करून पप्पासाहेबांनी सत्ताधाच्यांचा विरोध बाजूला सारून
शेतक-्यांना न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. म्हणून पप्पासाहेबांच्या व्याक्तीमत्वाबद्दल म्हणावेसे
वाटते..
जाणूनी भटकंती गरिबांची
पेरिले जनसेवा गावोगाव..
जनता लेकुरे तुमची,
तुम्ही जनतेचे देव.
अशा निष्पृह जनसेवक लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील उर्फ पाप्पासाहेबांना ६७ व्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन !!
मयुर नवनाथ माने
सरचिटणीस-महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना
मा.उपसरपंच ग्रामपंचायत गिरझणी