
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
वालचंदनगर : (दि.३०) निरवांगी (ता.इंदापुर) येथे दिनांक ३० जुन रोजी संत सोपानकाका महाराज यांची पालखी मुक्कामी येत असुन.निरवांगी करांनी संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे असे निरवांगीच्या सरपंच सुरेखा चांगदेव गुरव यांनी सांगितले.निरवांगी येथील निरा नदी काठावर असलेल्या पालखी मुक्कामस्थळी विद्युत रोषणाईसह वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
पालखी तळावरती सुमारे १००फुट लांबी व १०० फुट रुंदीचा जर्मन हॕगर उभा केला असून हा हॅंगर वाॅटरप्रृफ असल्याने पाऊस आला तरी पाणी आता येणार नाही.तर वारकऱ्यांसह भाविक भक्तांची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली असून.चालती स्वच्छतागृह देखील या ठिकाणी उभी करण्यात येत असून आरोग्य सेवेच्या दृष्टीकोनातून आरोग्य विभाग देखील वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.
निरवांगी येथे गेली अनेक वर्षांपासून संत सोपानकाका महाराजांची पालखी मुक्कामी असुन पालखीसाठी जवळपास पाच एकर क्षेत्रावर पालखीतळ तयार करण्यात आले आहे.तर या वर्षी पालखी ठेवण्यासाठी विशेष दगडी बांधकामात नक्षीकाम करुन कायम स्वरुपीचा पालखी कट्टा तयार करण्यात आला आहे.
पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी उपसरपंच सुरज कांबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, संतोष पोळ, बाळासाहेब गायकवाड, संजय पोळ, अंगणवाडी सेविका विजया बोबडे, सुवर्णा कुलकर्णी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
निरवांगी येथे दरवर्षी प्रमाणे संत सोपानकाका महाराज यांची पालखी ३० तारखेला मुक्कामी येत असुन.पालखी व पालखी सोबतच्या वारकरी व भाविक भक्तांची सोय करण्यात आली असून.पालखी तळाची पाहणी व मार्गदर्शन तहसीलदार जीवन बनसोडे व गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी वारंवार केले आहे.
विजयमाला रणवरे
ग्रामसेवक ग्रामपंचायत निरवांगी