
इंदापूर : बारामती शहरातील नगरपालिके समोरील भिगवन चौकामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशाचे पालन करत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना घेऊन पहिलीपासूनच्या मुलांवरती शिक्षणात हिंदीची सक्ती केल्याबाबत सरकारने काढलेल्या जीआर चा निषेध व होळी करण्यात आली.यावेळी निषेधासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री संजय काळेजिल्हा समन्वयक भीमराव भोसले, बारामती विधानसभा संपर्कप्रमुख अधिराज कोठाडीया, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख निलेश मदने, विधानसभा क्षेत्र प्रमुख बंटी उर्फ राकेश गायकवाड, बारामती शहर प्रमुख पूर्व सर्वेश वाघ, बारामती शहर समान एक राजेंद्र गलांडे, बारामती शहर संघटक राजेश शहा, बारामती शहर सचिव मोठेसिम जैदी, जेष्ठ शिवसैनिक ॲड नंदकुमार भागवत , युवासेना तालुका युवाअधिकारी निखिल देवकाते, उप तालुकाप्रमुख नितीन गायकवाड, उपविभाग प्रमुख श्रीनाथ भोंडवे, लिमटेक शाखाप्रमुख दादा दळवी, काटेवाडी शाखाप्रमुख उमेश गायकवाड हे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.