
लोकशासन-इंदापुर ग्रामीण
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथील प्रतापगड याठिकाणी नुकतेच पार पडले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणीसह तालुका प्रभारी, गट अध्यक्ष यांच्या निवडी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या. राज्य कार्यकारिणीत निमसाखर येथील धवलसिंह मोहिते पाटील यांचे अत्यंत विश्वासू असणारे सुदर्शन रणवरे यांची निवड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी केली.
सुदर्शन रणवरे गेले ११ वर्षांपासून डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असून निःस्वार्थ भावनेने काम करत असल्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः त्यांची दखल घेत आपल्या संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीत तसेच इंदापूर तालुका प्रभारी अशी दुहेरी जबाबदारी दिली. तसेच मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात सुदर्शन रणवरे यांचे विशेष कौतुकही केले.
यावेळी सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, शंकरराव मोहिते पाटील सह. बँकेच्या चेअरमन डॉ उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह राज्यभरातून आलेले संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र जनसेवा संघटना ही अराजकीय संघटना असून सामाजिक कामासाठी अग्रेसर असणारी ही संघटना स्व. लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचारावर व डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी काम करत आहे.माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिक पार पाडणार असल्याचे सुदर्शन रणवरे यांनी सांगितले.