
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
इंदापूर : कृषी मंत्र्यांची खांदे पालट करण्यात आली असून मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माणिकराव कोकाटे यांच्या कडे असलेले कृषी खाते काढून घेण्यात आले असून त्या जागी क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे हे मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यांने तसेच सभागृहात मोबाईल वरती आॕनलाईन रम्मी पत्ते खेळत असल्याचे चित्रीकरण समाज माध्यमातून प्रसारित होत होते.तर “कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटील” की म्हणत त्यांनी या पदाचा आणि एक प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान केला होता.सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या कडून कृषी मंत्री पदाची जबाबदारी काढून घेत त्यांना दत्तात्रय भरणे यांच्या कडे असलेले क्रिडा व युवक कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे