
इंदापूर : इंदापूर येथे दिनांक ११ ऑगस्ट २०२५ सकाळी ११:३० वाजता पुणे सोलापूर हायवे हिंगणगाव पाटी येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले गडी व समाधी स्थळावर झालेले अतिक्रम हटवण्यात यावे यासाठी पुणे सोलापूर बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर सरदार मालोजीराजे भोसले यांच्या कडे इंदापूर सुपे परगाण्याची मनसबदारी होती.वीर सरदार मालोजीराजे भोसले यांचे इंदापूर येथे वास्तव्य असताना सन १६२० साली वयाच्या ६८ वर्षी देहावसान झाले होते.इंदापूरच्या रणक्षेत्रावर मालोजीराजे धारातीर्थी पडले.भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीराजेंच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले होते.
सध्या मालोजीराजेंची गढी व समाधीस्थळाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.हि अतिक्रमणे हटविण्यासाठी इंदापूर येथे दिनांक ११ ऑगस्ट २०२५ सकाळी ११:३० वाजता पुणे सोलापूर हायवे हिंगणगाव पाटी येथे पुणे सोलापूर बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.