
लोकशासन- संपादकीय
इंदापूर : ” महिन्या भरात मला एखाद पद मिळाल तर सगळे लगेच पटापटा येतील इकडे ” हे वाक्य आहे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर मधील एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी हे शब्द उद्गारले आणि तालुक्याच्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.सध्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल हे सांगताच येत नाही.त्यातच गेली काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप वापसी च्या चर्चांना ऐनकेन प्रकारे हवा मिळत आहे.त्यातच हर्षवर्धन पाटलांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या चर्चां झडु लागल्या आहेत.
२०१९ च्या विधानसभे पुर्वी भाजप मध्ये दाखल झालेले हर्षवर्धन २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर भाजप मध्ये कार्यरत होते.भारतीय जनता पक्षाने देखील हर्षवर्धन पाटलांना ताकद देत सहकारातील अनुभवाच्या जोरावर अमित शहा यांच्या कडे असलेल्या केंद्रीय सहकार मंत्री पदाच्या अखत्यारीतल्या राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष पद देण्यात आले.महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार आणि साखर उद्योगाचा असलेला पगडा पाहता भारतीय जनता पक्षा कडून हर्षवर्धन पाटील यांना हि खुप मोठी ताकद देण्यात आली होती.
पुढील काळात राजकीय समीकरणे बदलत गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडुन अजित पवार महायुती मध्ये सामील झाले.पर्यायाने इंदापूर मधील हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दत्तात्रय भरणे देखील महायुतीचा भाग झाल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभेच्या अडचणी वाढल्या आणि हर्षवर्धन पाटील यांनी भाजप चे कमळ खाली ठेवून शरद पवारांची तुतारी हाती घेतली.
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत देखील पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला.२०२५ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तितकेसे रमल्याचे दिसले नाही तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने देखील पाटलांनवर सोपवलेली राष्ट्रीय साखर संघाची जबाबदारी अबाधितच ठेवल्याने पाटलांच्या भाजप मध्ये वापसी च्या आशा पल्लवितच राहिल्या आहेत.मध्यंतरीच्या काळात इंदापूर ची विधानसभा अपक्ष लढवणाऱ्या प्रविण माने यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर काही काळ पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या मंदावलेल्या चर्चांना अधुन मधुन प्रसिद्धीचा डोस दिलाच जातो.त्यातच हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यांने पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.
“भाजप सोबत हर्षवर्धन पाटील जाणार कि शरद पवार गटच”
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली दरबारी अनेक राजकीय घडामोडी घडत असुन गाठी भेटींचा सिलसिला सुरू आहे.यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील एक गट महायुती सोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी चे विलीनीकरणाच्या देखील चर्चा होत असतात त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या ” महिन्या भरात मला एखाद पद मिळाल तर सगळे लगेच पटापटा येतील इकडे “या वाक्याचा अर्थ काय लावायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.