वालचंदनगर पोलीस स्टेशनला मिळाला आय.एस.ओ 9001-2015 मानांकन दर्जा

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे इंदापूर ग्रामीण

वालचंदनगर : वालचंदनगर पोलीस स्टेशन यांना आय.एस.ओ स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकनासाठी आवश्यक असलेल्या 37 निकषांतील नियम, अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केल्यामुळे इंदापुर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनला आय.एस.ओ 9001-2015 सर्टिफाईड स्मार्ट पोलीस स्टेशन श्रेणी अ++ (ISO 9001-2015) Certified SMARAT police station With Grade A++ मिळाला आहे. सोलापुर येथील संस्थेने केलेल्या पाहणीनुसार पोलीस स्टेशनला १०० पैकी ९३ मार्क मिळाले आहेत.

नवीन निकषानुसार स्मार्ट पोलीस स्टेशनचा आय.एस.ओ दर्जा मिळालेले पुणे ग्रामीण जिल्हामधील वालचंदनगर पोलीस स्टेशन हे दुसरे पोलीस ठाणे ठरले आहे.पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या अनुशंगाने दर शनिवारी तक्रार निवारण केले जाते, तसेच दाखल झालेल्या गुन्हांमधील ८५ टक्के गुन्हयांचा निपटारा केलेला आहे. पायाभुत सुविधा, अदयावत तंत्रज्ञानचा वापर, कामकाजातील तत्परता, सायबर क्राईम, भौगौलिक परिसर, जनतेचे अभिप्राय, तंत्रज्ञान प्राविण्य, संगणकीकरण, दस्तऐवज नियंत्रण, रात्रगस्त, अवैध धंददे कारवाई तसेच गंभीर गुन्हे उघडकीस आणुन त्याप्रमाणे कार्यवाही करणे या सर्व गोष्टी आय.एस.ओ मानांकनासाठी पात्र ठरल्याने वालचंदनगर पोलीस स्टेशनला पात्र ठरल्याने पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाला आहे.

वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे बारामती इंदापुर रोडवरील पालखी महामार्गावर असलेले जंक्शन ता. इंदापुर येथे असुन हे संवेदनशील पोलीस स्टेशन आहे. सन 1990 मध्ये सदर पोलीस स्टेशनची स्थापना झाली असुन सन २०२४ मध्ये सदर पोलीस स्टेशनसाठी ०९ कोटी रुपयो खर्च करुन सुसज्ज इमारत बांधली आहे.पोलीस स्टेशनला ०५ एकरचा परिसर असुन सदर पोलीस स्टेशन आवारामध्य अधिकारी वर्गासाठी ०४ निवासस्थानांची सोय केलेली आहे. तसेच परिसरात मध्ये ३०० विविध प्रकारचे फळजाडे, देशी झाडांची लागवड केलेली आहे. तसेच नागरिकांसाठी व पोलीसांसाठी विविध प्रकाराचे दोन पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

पोलीस स्टेशन इमारती मध्ये पोलीस अधिकारी, फौजदार, गोपनीय, दत्परी कक्ष, पासपार्ट, बारनिशी, क्राईम, ठाणे अंमलदार, वायरलेस आदी विभागासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. महिला व पुरूष कैदयांसाठी कोठडीची सुविधा आहे. तसेच सुसज्ज असे स्वच्छता गृह देखील आहेत. सर्व खोल्यांमध्ये फर्निचर, पिण्याचे पणी, सोलर, फायर सिस्टीम अशा सुविधा दिलेल्या आहेत. तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वतंत्र आसन व्यवस्था तसेच त्यांना वाचन करण्यासाठी विविध प्रकारची वर्तमानपत्र, मासिक व घडामोडी अशी सुविधा करुन दिलेली आहे. संदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग व डॉ. सुर्दशन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे व त्यांचा सहकारी स्टाफ यांनी सदर पोलीस स्टेशनचा कायापालट करुन उत्तम कामगिरी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button