
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्री गणेश उत्सव अनुषंगाने सर्व दहीहंडी उत्सव आयोजक तसेच सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी यांची आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी ११:०० वा.ते १२: वा. भिगवण पोलीस स्टेशन येथे बैठक घेण्यात आलेली आहे.सदर बैठकीस उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्री गणेश उत्सव सणाचे अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचनां देण्यात आल्या.
१) मा.धर्मादाय आयुक्त सो यांचे कडे नोंदणी नसलेल्या गणपती मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांचे कडुन श्री गणेश उत्सव कालावधी करिता तात्पुरता परवाना घेणे आवश्यक आहे.
२) पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत,महावितरण ,यांची परवानगी प्राप्त करावी .
३) दिवसा व रात्रौचे वेळी श्री गणेश मुर्तीचे संरक्षण तसेच मुर्तीचे दागिन्यांचे संरक्षण या करीता प्रत्येक मंडळाचे वतीने स्वयंसेवक सुरक्षा रक्षक नेमणे, त्याची संपूर्ण जबाबदारी मंडळाची असेल.
४) मंडपामध्ये किंवा गणपतीचे मुर्तीचे ठिकाणी करण्यात येणारी वीज जोडणी/करण्यात येणारी रोषणाई सुरक्षित असले बाबत एम.एस.ई.बी.कार्यालयातील संबधित कर्मचा-यांकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र घ्यावे.
५) प्रत्येक मंडळाने आपले अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचे संपूर्ण,नाव, पत्ता, मोबाईल नंबरची यादी मंडळा समोर दर्शनी भागात लावावी.
६) गणपतीच्या मुर्तीच्या संरक्षणाकरिता २४ तास स्वयंसेवक नेमावेत.
७) गणेश मंडपात आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.
८) मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीक्षेपकावर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालनकरण्यात यावे. लेझर लाईट चा वापर कोणीही करू नये असे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल
९) गणेशोत्सवात दर्शविण्यात येणारे देखावे/चित्रे हे चिथावणारे अथवा जातीयवादी नसावेत.
१०) ध्वनी क्षेपकावर अश्लील गाणी लावणार नाहीत.
११) मिरवणूक जास्त वेळ एका ठिकाणी रेंगाळत ठेवू नये.
१२) गणेश मूर्ती स्थापन पेंडॉल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तात्पुरता स्वरूपात लावण्यात यावे.
१३)जात ,धर्म ,पंथ,व्यक्ती ,समाजच्या भावना दुखवतील असे फ्लेक्स देखावेकृत्य नृत्य संगीत होणार नाहीत याची दक्षता खबरदारी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
१४)दहीहंडी दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये याकरता स्वयंसेवक नेमण्यात यावेत
१५) दहीहंडी मध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी.