
लोकशासन-प्रतिनिधी:महेश झिटे,श्रीगोंदा
श्रीगोंदा : (दि.२२) पुणे व घाट माथ्यावर सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे भीमा नदीला महापूर आला आहे. खडकवासला धरणातून तब्बल १९३३४ केसेस वेगाने पाणी सोडण्यात आले असून दोन बंधाऱ्यातून १७५००० क्युसेस वेगाने वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या दरम्यान नदीचे पात्र सोडून पाणी शेतामध्ये घुसले आहे अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाण्याखाली गेले आहे त्याचबरोबर नदीकाठच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.यामध्ये विशेषता कापूस व उसाचे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. नुकतेच कापसाला फुल येण्यास सुरुवात झाली असताना हात हातात तोंडाशी घास आलेला हिरवावुन घेतल्यासारखी स्थिती झाली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी नेहमीच कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करीत असून आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारने अद्यापही नुकसान भरपाई याबाबत ठोस भूमिका घेतली असल्यामुळे शेतकरी वर्गावर नाराजीचा वातावरण झालेले आहे.
भीमा नदीच्या पुराने हिरवून नेलेले शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आस्वारनावर होत आहे. शासनाकडून तात्काळ पण चलना करून मदत करावी अशी पेडगाव येथील शेतकऱ्याकडून मागणी होत आहे.