
लोकशासन-प्रतिनिधी:शंकर जोग,पुणे शहर
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पुणे शहर पदाधिकारी नियुक्तीचा समारंभ प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.या मध्ये पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मनीषाताई संदीप लडकत यांची भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले, मनीषाताई लडकत २०१७ ते २०२२ पर्यंत पुणे महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम पाहिले ते पुणे महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदी महिला बालकल्याण समिती सदस्य पदी शहर सुधारणा समिती सदस्य पदी व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते.
पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती राहून त्यांनी जबाबदारी पार पाडल्या व विविध समाजातील कार्यक्रमांमध्ये सहभाग होऊन संयोजन करून जबाबदारी पार पाडली त्याची दखल घेऊन भाजपा नेत्यांनी त्यांना पुणे शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी जबाबदारी दिली.
लोकशासनच्या https://lokshasan.in Web Portal वर भेट द्या आणि बातम्या व जाहिराती करीता संपर्क : what’s up : 8007108688