दौंड तालुका महसुल सेवा पंधरवडा” उपक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल कुल यांच्या हस्ते संपन्न

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण

पुणे ग्रामीण : ( ता.२१ ) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी दौंड तालुका महसुल सेवा पंधरवडा” या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते संपन्न यांचा जन्मदिन (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियान अंतर्गत “दौंड तालुका महसुल सेवा पंधरवडा” या उपक्रमाचा शुभारंभ आज आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात महसूल सेवा पंधरवडा दरम्यान देण्यात येणाऱ्या सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महसुल विभागाच्या सेवांची लोकाभिमुख अंमलबजावणी, नागरीकांच्या अर्जांचे वेळेत निपटारे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.यामध्ये प्रमाणपत्रे, नोंदी, शासकीय लाभ, तसेच इतर महसुल सेवा पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.दौंड तालुक्यात महसूल विभागामार्फत सर्व गावातील गाव रस्ते, शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन यादी बनविण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील प्राथमिक स्वरुपात एकूण १६ गावांचे GIS आधारित MAP अनावरण आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा, ५० भटक्या व विमुक्त जाती यांचे जातीचे दाखले, १२५ संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना मंजूर लाभार्थी यांचे प्रमाणपत्र, १३४ भामा आसखेड व पुनर्वसन शेरे कमी केलेचे दाखले, २६ पुनर्वसन भूखंड वाटप दाखले, ३२ शिधापत्रिका वाटप, ४ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा वाटप आदी योजनांचे वाटप करण्यात आले. दौंड तालुक्यातील सर्व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले.

यावेळी प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, उप अधिक्षक भूमि अभिलेख धनराज शिंदे नायब तहसिलदार तुषार बोरकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी सपन गड्डमवार, राजेश कानसकर, ममता भंडारे, तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाणे, याबरोबरच सर्व महसूल, कृषी कर्मचारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, महा ई सेवा केंद्र चालक व लाभार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button