
लोकशासन- प्रतिनिधी : मयुर माने,अकलूज
कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो.गेली अनेक वर्षे महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांना मोहोळ कुटुंबा कडून कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ चांदीची मानाची गदा देण्यात येते.परंतु या स्पर्धेत उपविजेता ठरणाऱ्या उपमहाराष्ट्र केसरी पैलवानाचाही सन्मान या स्पर्धेतून व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा उपमहाराष्ट्र केसरी पैलवानाला देण्यास २०२२ पासून सुरवात झाली. त्यामुळे माती आणि गादी दोन्ही विभागातील विजेत्या पैलवानांचा सन्मान महाराष्ट्राच्या मातीत होताना पाहायला मिळतोय.