भाजपा युवा मोर्चा विधानसभा आढावा बैठक इंदापूर शहरात उत्साहात संपन्न

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण

इंदापूर – (ता.१५) इंदापूर येथे भाजप युवा मोर्चा इंदापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. आगामी नगरपालिका, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात युवा मोर्चाची रणनीती, संघटन बांधणी आणि कार्यपद्धतीवर सखोल चर्चा करण्यात आली.

आगामी निवडणुकांमध्ये युवा मोर्चा अधिक ताकदीने, सुसंघटित पद्धतीने आणि प्रभावी ध्येयासह कार्यरत राहणार असल्याचा ठाम निर्धार या बैठकीतून व्यक्त झाला.बैठकीदरम्यान शहर आणि ग्रामीण मंडळ कार्यकारणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक मंडळातील सदस्यसंख्या, कार्यकर्त्यांचा सहभाग, प्रलंबित संघटन कामे,युवा मोर्चाच्या पुढील कार्यक्रमांची आखणी यावर चर्चा झाली.युवकांना अधिक जबाबदाऱ्या देणे, नवीन सदस्य वाढवणे,बूथ स्तरावर युवा मोर्चा मजबूत करणे आणि आगामी निवडणुकीत युवकांची निर्णायक भूमिका यावरही विषयमंथन झाले.

या आढावा बैठकीस भाजप युवा मोर्चा पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी इंदापूर विधानसभा युवा मोर्चाच्या कार्याची प्रशंसा करत आगामी निवडणुकांमध्ये युवकांची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी महत्वाच्या सूचनाही दिल्या.

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, भाजपची विकासाची भूमिका आणि संगठन विस्तार यावर त्यांनी मार्गदर्शनपर भाष्य केले.यावेळी पश्चिम मंडल अध्यक्ष राजाभाऊ जठार,शहर अध्यक्ष किरण गानबोटे,पूर्व अध्यक्ष राम आसबे,ग्रामीण अध्यक्ष तेजस देवकाते,युवा मोर्चा अध्यक्ष लखन जगताप,ग्रामीण अध्यक्ष दादा नायकुडे,शुभम शिंगाडे,जिल्हा सचिव सुयोग सावंत,संदीप आदलिंग,जेष्ठ नेते शिरदले अण्णा,हर्षवर्धन कांबळे,मंगेश माने,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर मते मांडली आणि आगामी निवडणुकांसाठी युवा मोर्चा सज्ज असल्याचे स्पष्ट केले.बैठकीच्या शेवटी युवा मोर्चा इंदापूर शहर अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.युवा शक्ती, शिस्तबद्ध संघटन आणि जनसंपर्काच्या जोरावर भाजप युवा मोर्चा येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये उत्तम कामगिरी करेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे आणि इंदापूर चे नेते प्रवीण माने यांच्या नेतृत्वात “आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युवा मोर्चाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.संघटनेची ताकद बूथपातळीवर वाढवून युवकांनी पुढील काळात निर्णायक योगदान द्यावे.इंदापूर विधानसभा युवा मोर्चा शिस्त, संघटन आणि गतिमान कार्यपद्धतीच्या बळावर निश्चितच उत्तम कामगिरी करेल,असा मला विश्वास आहे.”

वैभव सोलनकर, जिल्हा अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा पुणे ग्रामीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button