
लोकशासन – प्रतिनिधी:इंदापूर शहर
इंदापूर – इंदापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर व प्रविण माने यांनी एकत्र येत कृष्णा भिमा विकास आघाडी स्थापन करून हि निवडणूक एकत्र लढत आहेत.राष्ट्रवादी काॅंग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या प्रदिप गारटकर यांना या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करुन स्थानिक पातळीवर इंदापूर शहराच्या विकासासाठी एकत्र येत हि आघाडी स्थापन करण्यात आली आहे.
सध्या कृष्णा भिमा विकास आघाडी ला इंदापूर शहरा मधुन वाढता प्रतिसाद मिळत असून शिवसेना (उबाठा) गट देखील या आघाडी मध्ये सामील झाला असून शिवसेने कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या महादेव सोमवंशी तर नगरसेवक पदाचे उमेदवार ज्ञानेश्वर खंडागळे यांनी अर्ज माघारी घेत.शिवसेना देखील इंदापूर नगर परिषदेच्या निवडणूकीत सर्व पक्षीय कृष्णा भीमा विकास आघाडी मध्ये सामील झाली आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे विशाल बोंद्रे अरुण पवार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार व पदाधिकारी यांचे स्वागत व आभार आघाडीचे नेते हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, प्रवीण माने,मयुर पाटील यांनी केले.