
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण
दौंड नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नागरिक हित संरक्षण मंडळ, भारतीय जनता पार्टी, आरपीआय (A) आणि पीआरपी यांच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे.
या प्रचाराची सुरुवात भव्य पदयात्रेद्वारे होणार असून पदयात्रेला दुपारी ३ वाजता छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून प्रारंभ होईल.पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, कुंभार गल्ली, पंडित नेहरू चौक, धर्मवीर संभाजी महाराज स्तंभ, सिंधी धर्मशाळा मार्गे पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या जाहीर सभेत सामील होणार आहे.या सभेत महायुतीचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून “दौंडचा विकास” हा केंद्रबिंदू ठेवून मार्गदर्शन केले जाणार आहे.
पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया तसेच आमदार राहुल कुल यांनी दौंडकरांना आवाहन केले आहे की, “आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”