महसूल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांचा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांच्या कडून सत्कार

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी,इंदापुर ग्रामीण

इंदापूर : महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यातील पहिला निर्णय म्हणजे राज्यातील (शहरी – ग्रामीण) २०११ पर्यंतची १५०० चौ. फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत.या मुळे ज्यांना घरकूल बांधण्यास स्वताची जागा नाही म्हणून घरकूलाचा लाभ मिळत नव्हता त्या गरीब गरजू लोकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.ग्रामपंचायत व नगर पालिका यांचा महसूल वाढून त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणारा निर्णय आहे.

ग्रामीण भागात शेतीचे सर्वाधिक वाद हे पानंद रस्ते अडवल्यावर होत होते त्यावर नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.पानंद रस्ता जर आडवला तर तहसीलदार सात दिवसात पहानी करून कारवाई करणे बंधनकारक असेल.तसेच जो रस्ता आडवेल त्याचे सर्व सरकारी लाभ बंद होणार असून त्याचा फार्मर आयडी रद्द केला जाणार आहे.या दोन्ही एतिहासीक निर्णयाचा शासन आदेश काढून सामान्य लोकांना मोठा दिलासा दिल्या बद्दल महसूल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांचा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांनी व पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून त्यांचे आभार मानले आहेत.

यावेळी त्यांच्या समवेत दौडचे आमदार राहूल कूल,प्रदेश महामंञी राजेश पांडे,जिल्हाध्यक्ष शेखर वढणे,वासुदेव काळे,बाळासाहेब गावडे,पांडुरंग कचरे,आकाश कांबळे,तेजस देवकाते,अविनाश मोटे,संदीप आदलींग,पांडुरंग सुळ या सह अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button