
लोकशासन : प्रतिनिधी,भवानीनगर
इंदापूर तालुक्यातील सणसर भवानीनगर मधील अशोकनगर भागात राहत असलेल्या या आरोपीस खांडज तालुका बारामती येथून अटक करण्यात आले आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे कि सणसर भवानीनगर येथील अशोकनगर मध्ये राहत असलेल्या ज्ञानेश्वर रघुनाथ कांबळे याचे शेजारी राहणारी विवाहित महिले सोबत प्रेमसंबंध होते. ज्ञानेश्वर कांबळे व संबधित महिला हे दोघे संगणमताने काही दिवसापूर्वी या प्रेम संबंधातुन १५ दिवस पळून गेले होते.नंतर ज्ञानेश्वर व महिला परत अशोकनगर भवानीनगर ता इंदापुर जि पुणे येथे परत आले.या नंतर सदरील महिलेचा पती सौरभ व त्याचे नातेवाईक मारुती शंकर वाघमारे, सुरज मारुती वाघमारे, दिनेश अशोक शिंदे हे सर्व रा. अशोकनगर भवानीनगर ता इंदापुर जि पुणे यांनी ज्ञानेश्वर रघुनाथ कांबळे जिवे मारण्याची धमकी देत बोलले की आम्ही तुम्हाला, तुमचे परिवाराला जिवे मारुन टाकु अशी धमकी दिली असल्याचे ज्ञानेश्वर रघुनाथ कांबळे याचा भाऊ अमोल रघुनाथ कांबळे याने पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाबात सांगितले.
सौरभ सोमनाथ कांबळे व त्याचे बरोबर इतर अनोळखी पाच इसम घरासमोर येऊन ज्ञानेश्वर कोठे आहे अशी विचारणा करीत घरात घुसले या वेळी ज्ञानेश्वर घरात झोपलेला होता त्यावेळी सौरभ याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने ज्ञानेश्वर यांचे तोंडावर व गळ्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करु लागला त्यावेळी सौरभ यांचे बरोबर असलेले अनोळखी इसमाने त्याचेकडील कोयत्याने ज्ञानेश्वर यांचे मानेवर वार करीत असताना इतर अनोळखी इसमाने त्याचे पाय व हात धरुन त्याला लाथाबुक्यांनी मारहान केली असून या प्रकरणी सौरभ समनाथ कांबळे (रा.खांडज) बारामती यास अटककेली आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय