पुण्यात ‘युवा संकल्प महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; १०१ गुणवंतांचा ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरव !

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी : पुणे शहर

पुणे : युवा प्रबोधन साहित्य मंच, ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था आणि बंडखोर साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवा संकल्प महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६’ हा दिमाखदार सोहळा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. “कार्य तुमचे, कर्तव्य आमचे” हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील १०१ गुणवंतांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात ठेवा’ असा मोलाचा संदेश विशाल लोंढे यांनी तरुणांना दिला. “शिका आणि संघटित व्हा, हा महामानवाचा मंत्र आचरणात आणताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते डोक्यात ठेवा आणि त्याप्रमाणे कृती करा,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे उद्घाटन आर.पी.आय. पुणे शहराध्यक्ष मा. शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, व्याख्याते संपत गारगोटे, कवी जितेन सोनवणे, साहित्यिक वीणा कडू, आणि वृषाली वीरगुर्जर उपस्थित होते.

कार्यक्रमाला अभिनेत्री गौरी गायकवाड आणि लावण्यवती काव्या मुंबईकर यांची विशेष उपस्थिती लाभली. सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे काही कारणास्तव या सोहळ्याला अनुपस्थित राहिले. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या पुणे जिल्हाध्यक्षा ज्योतीताई गायकवाड (लोंढे) यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले, त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.

वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे दुपारी ३:३० ते ६:०० या वेळेत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम भंडारे,यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. स्वागत आयडियल ॲड कंपनीचे संस्थापक संतोषभाऊ वाकोडे यांनी केले. मुख्य आयोजक, ज्योतीताई गायकवाड, अश्विनीताई लोंढे, , सोनाली सुतार आणि इतर सहकाऱ्यांच्या नियोजनामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

“लोकशासन” बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button