राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी किरण गोफणे यांची निवड

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी: इंदापूर शहर

इंदापूर : राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी नुकतेच जाहीर झाली असून इंदापूर येथील किरण गोफणे यांची प्रदेश सरचिटणी पदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी गोफणे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

या निवडीच्या निमित्ताने एका निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाने चांगली संधी दिली यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आनंदित झाले आहेत किरण गोफणे यांनी २००५ पासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये इंदापूर शहराध्यक्ष इंदापूर तालुका अध्यक्ष माढा व करमाळा विधानसभेचे निरीक्षक पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि आता रासपाच्या प्रदेश सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली आहे.

गेले २१ वर्ष पक्षाध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या विचाराचा पाईक असणाऱ्या किरण गोफणे यांनी इंदापूर तालुका तसेच जिथे जिथे जबाबदारी मिळेल तिथे प्रामाणिकपणे काम पार पाडलेले आहे.पक्षात निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला जातो असे या निवडीद्वारे सिद्ध झाल्याचे मत पुणे जिल्हा अध्यक्ष तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजी शिंगाडे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button